मराठी कॉर्नर सभासद

Friday, November 27, 2009

तिची आठवण येते

तिची आठवण येते

राहतो मी एकटा जेव्हा, तिची आठवण येते
विरहात तळमळतो तेव्हा, तिची आठवण येते
तसा मित्रांच्या सोबतीत असलो तर तिला विसरून जातो मी
प्रेमाचा विषय निघतो तेव्हा, तिची आठवण येते
पावसात भिजण्याची मजा काही औरच असते
ढगांचा गडगडाट होतो तेव्हा, तिची आठवण येते
आता कुठल्याच गोष्टींवर मला हसु येत नाही
कुणी हसताना दिसलं तेव्हा, तिची आठवण येते
ईथे सर्व जण मला माझ्या नावाने हाक मारतात
कुणी ऐकतोस का म्हटले कि, तिची आठवण येते
तसा स्वत:ला खुप संभाळलय मी
पण ठेच लागते जेव्हा, तिची आठवण येते
आता तर अंधारच माझी सावली आहे
कुणी ज्योत जरी लावली जेव्हा, तिची आठवण येते

No comments:

Post a Comment