मराठी कॉर्नर सभासद

Saturday, November 21, 2009

काही नाती

काही नाती

काही नाती मिरवायची असतात मेडल्ससारख़ी
काही नाती दाख़्वायची असतात दाख़वायच्या दातासारख़ी
काही नाती भोगायची असतात सम्राटासारख़ी
काही नाती वहायची असतात ओझ्यासारख़ी
काही नाती ओळख़ायची असतात गुपितासारख़ी
काही नाती समजायची असतात प्रेमासारख़ी
काही नाती जोडायची असतात रेशमी धाग्यासारख़ी
काही नाती पेलायची असतात गोवर्धनासारख़ी
नाती गोती हातात नसतात नशिबासारख़ी
म्हणूनच काही नाती विसरायची असतात दु:ख़ासारख़ी

1 comment: