मराठी कॉर्नर सभासद

Friday, November 20, 2009

एक जाहीरनामा घ्यायंचाय

एक जाहीरनामा घ्यायंचाय

मला सुद्धा सरकारकडुन एक जाहीरनामा घ्यायंचाय
त्यात सर्व कटकटींचा सोक्षमोक्ष लावायंचाय
बरीच सरकारे आलीत आणि बरीच निघुन गेलीय
आश्वासनांची पार राखरांगोळी झालीय
म्हणुन मला सरकारकडुन एक जाहीरनामा घ्यायंचाय
त्यात सर्व कटकटींचा सोक्षमोक्ष लावायंचाय
..
माझा देश होता तिथेच आताही मला दिसतोय
कारण देश चालवायची नियत कुणामध्येच न दिसतेय
महाराजांनंतर देश चालवायची जिद्द न कुणाजवळ राहीलीय
निती आणि नियतीमधली सांगड हरवुन गेलीय
म्हणुन मला सरकारकडुन एक जाहीरनामा घ्यायंचाय
त्यात सर्व कटकटींचा सोक्षमोक्ष लावायंचाय
..
कायदा आणि सुव्यवस्थेची पार भंबेरी उडुन गेलीय
भ्रष्टाचार आणि अत्याचाराची जणु मांदियाळी झालीय
आत्महत्या आणि लोडशेडींगचा महापूर आलाय
रडण्यासाठी सरकारने जणू अश्रुधूर सोडलाय
म्हणुन मला सरकारकडुन एक जाहीरनामा घ्यायंचाय
त्यात सर्व कटकटींचा सोक्षमोक्ष लावायंचाय
..
कोण आता वाट दाख़विल काहीच कळत नाहीय
यापेक्षा पारतंत्र्य बरे असे वाटु लागलय
या असल्या स्वातंत्र्याचे स्वप्न न पाहिलेय
परत स्वातंत्र्य मिळविण्या मावळे न राहीलेय
म्हणुन मला सरकारकडुन एक जाहीरनामा घ्यायंचाय
त्यात सर्व कटकटींचा सोक्षमोक्ष लावायंचाय
..
शेवटी एकच काम हाती माझे राहिलेय
प्रत्येकाचे जाहीरनामे रोज वाचत राहीलोय
म्हणुन आता एकच स्वप्न मनात ठेवलेय
मला सुद्धा सरकारकडुन एक जाहीरनामा घ्यायंचाय
त्यात सर्व कटकटींचा सोक्षमोक्ष लावायंचाय

No comments:

Post a Comment