मी आणि ती
श्रावण महिना होता
पौर्णिमेची रात्र होती
मी तिच्या जवळ होतो
ती माझ्या जवळ होती
..................
नंतर ती माझ्याजवळ आली
थोडीशी घाबरलेली
जेव्हा मी तिचा हात पकडला
थोडीशी लाजलेली
..................
तिने म्हटले आज आपण
अश्या बंधनात अडकुन जाऊ
ज्याला दुनियेतली कुठलीही
ताकत तोडु शकणार नाही
...................
माझ्या आनंदाचा थांग
लागणं मुश्कील होतं
पण याच्या समोर जे घडलं
ते सांगण पण मुश्कील आहे
....................
तिने माझा हात हातात
घेऊन म्हटल्
हे तर जन्मोजन्मीच
बंधन आहे
....................
नंतर मला आठवलं
हा श्रावण महिना आहे
पौर्णिमेची रात्र आहे
अरे आज तर रक्षाबंधन आहे
marathi
No comments:
Post a Comment