विश्वास होता मला एक दिवस प्रेम नक्की होईल
माहीत होतं मला एक दिवस वाट पाहण्याची परिक्षा नक्की येईल
तु शब्दांनी काही म्हण किंवा नको म्हणु
विचार करतोय की आज होकार नक्की येईल
देवाकडे उशीर आहे पण अंधार नाही
मन म्हणतंय कि तिच्याकडून संदेश नक्की येईल
माहीत नाही मला काय नेमके विपरीत घडले
पण वाटतं कि प्रेमळ शिक्षा ति नक्की देईल
मला विचारतेय का प्रेम करतो मी
का अशीच ति मला आयुष्यभर त्रास देईल
मनातल्या गोष्टी तिला सांगायच्या आहेत
पण ख़रंच ती त्या ऐकायला महत्व देईल
पाहतो तिला तेव्हा पाहतचं राहावं
वाटतं खरंच एक दिवस हॄदय बाहेर येईल
होईन मी तिचा कि होणार नाही
पण हॄदयात तिचे प्रेम कायम राहील
जीवनाचा काय पत्ता काय भरवसा
जर मेलो कधी तर त्यात तिचीच भुमिका राहील
तिच्या स्पर्शाने मनात उठलेले तरंग
दररोज माझ्या स्मरणात राहील
जर नाही देऊ शकलो माझ्या प्रेमाचा भरवसा
ही खंत माझ्या उरी वारंवार राहील
एकही क्षण दिवसाचा असा गेला नाही
ज्यावेळी तिची आठवण ना येईल
काही ना देता जे दिले आहे तिने
या जीवनातील प्रत्येक क्षणी मी ॠणी तिचा राहील
marathi
No comments:
Post a Comment