मराठी कॉर्नर सभासद

Friday, November 27, 2009

माझे लग्नानंतरचे काही दिवस

माझे लग्नानंतरचे काही दिवस

लग्नानंतरचे ते पहिलेच वर्ष होते
आनंदाला माझ्या पारावार नव्हता
आनंदाच्या क्षणांची नुसती अंघोळ होती
की सांभाळता सांभाळणे कठीण होत होते
सकाळी सकाळी मॅडमचे चहा घेऊन येणं
थोडसं लाजुनच मला झोपेतुन उठवणं
प्रेमाने तो हात माझ्या केसातुन फ़िरवणं
हळुच हसुन मला म्हणणं की
राज्ज्या चहा तर पिऊन घे नाहीतर उशीर होऊन जाईल
लवकर तयार हो, तुला ऑफ़ीसला पण जायचंय
मॅडम देवाचं रूप घेऊन आली होती
हृदय आणी मेंदुवर तिची पुर्ण पकड होती
श्वास जरी घेतला तरी तिचं नाव होत होतं
एक क्षणही दुर जाणं जीवावर येत होतं
.....................
जेमतेम पाच वर्ष लग्नाला झाली होती
त्यानंतर ची कहाणी पुर्णपणे निराळी होती
सकाळी सकाळी मॅडमचे चहा घेऊन येणं
टेबलावर आदळुन जोराने ओरडणं
आज ऑफ़ीसला जाल तर पिल्लुला शाळेत सोडुन जा
"अहो ऐकलंत का" परत एकदा आवाज आला
आज काय खास आहे गादीवरून अजुन नाही उठला
जर पिल्लुला उशीर झाला तर खबरदार
मग त्याच्या मॅडमला तुम्हीच सांभाळुन घ्यालं
न जाणो मॅडम कुठले रूप घेऊन आली होती
हृदय आणी मेंदुवर काळी सावली पडली होती
श्वास जरी घेतला तरी तिचीच विचार येत होता
प्रत्येक क्षणी मनात एकच विचार येत होता
कधी ते सुंदर दिवस परत येतील
मला परत एकदा उपवर करून देतील

No comments:

Post a Comment