कधी कधी
मी तुला विसरणार नाही
ना विसरू शकणार कधी
एक विनंती करतो तुला
सोडुन जाऊ नकोस कधी
सुख़ात तर साथ देतात सर्व
दु:ख़ात राहतात सोबत कधी
तुझ्यासारख़े सख़ेसोयरे
मिळतात कधी कधी
शक्य असल्यास माझी आठवण ठेव
समज आपला जर संकटात पडलीस कधी
मी तुझ्या विश्वासास पात्र नसेन ही
तरी माझी आठवण ठेव कधी कधी
marathi
No comments:
Post a Comment