मराठी कॉर्नर सभासद

Tuesday, November 24, 2009

मैत्री

रोजच आठवण यावी असे काही नाही
रोजच भेट घ्यावी असेही काही नाही
मी तुला विसरणार नाही
ह्याला ख़ात्री म्हणतात
ही ख़ात्री असणे ह्यालाच मैत्री म्हणतात

क्षण !

आठवणी संभाळणे सोपे असते
मनात त्या जपुन ठेवता येतात
पण क्षण संभाळणे अवघड असते
कारण क्षणार्धात त्याच्या आठवणी बनतात

मित्र

न संपणारे अख़ंड स्वप्न असावे
न बोलता ऐकु येतील असे शब्द असावेत
ग्रिष्मात पाऊस पडतील असे ढग असावेत
ना मागता साथ देतील असे मित्र असावेत

मित्र

चेहर्‍यावर तुझ्या स्मितहास्य असु दे.
जीवनात तुझ्या वाईट दिवस नसु दे.
जीवनाच्या वाटेवर अनेक मित्र मिळ्तील तुला
मात्र हृदयाच्या एका कोपर्‍यात जागा माझी असु दे.

No comments:

Post a Comment