मराठी कॉर्नर सभासद

Saturday, January 23, 2010

दिल के जख्मोंको

दिल के जख्मोंको मै दिखांऊ कैसे
कि तेरे सितम मै दुनिया को बतांऊ कैसे

अपने दिल को अक्सर ही बहला लेते है
हम वो हुए जो खफ़ां तो अब मै मनांऊ कैसे

वो तेरी शोख अदांए वो शरारती निगांहे
तु नही तो खुद को मै अब सतांऊ कैसे

हम खुद ही मिट गये तुम्हे भुलाने से पहले
तु ही बतां तेरे अक्स को दिल से मिटांऊ कैसे

मेरे बरबादे-हाल को तो दुनिया जानती है
तेरे करम तुझको ही मै बतांऊ कैसे

तेरी यादोंके सिवा कुछ ना बचा दामन मे मेरे
अब दुनिया मे इस दौलत को में लुटांऊ कैसे

अश्कोंका समुंदर भी पीकर मैने देख लिया
इस दिलमें लगी आग को मै बुझांऊ कैसे

तुने इश्क का सिला क्या मांग लिया है जाना
अपने ही हाथोंसे तेरे जनाजो को मै सजांऊ कैसे

रोना बहुत है

मोहोब्बत का गुमान होता बहुत है
के अब यह लब्ज भी रूसवा बहुत है

उदासी का सबब मै क्या बताऊ
गली कुचोंमे सन्नाटा बहुत है

तुझे मालुम तो होगा मेरी जान
तुझे हमने चाहा बहुत है

ना मिलने की कसम खाके भी मैने
तुझे हर राह में धुंडा बहुत है

यह आंखे और क्या किसीको देखें
इन आंखोंने किसीको देखा बहुत है

ना जाने क्युं बचा रख्खे है आंसू
अभी शायद मुझे रोना बहुत है

Friday, November 27, 2009

तिची आठवण येते

तिची आठवण येते

राहतो मी एकटा जेव्हा, तिची आठवण येते
विरहात तळमळतो तेव्हा, तिची आठवण येते
तसा मित्रांच्या सोबतीत असलो तर तिला विसरून जातो मी
प्रेमाचा विषय निघतो तेव्हा, तिची आठवण येते
पावसात भिजण्याची मजा काही औरच असते
ढगांचा गडगडाट होतो तेव्हा, तिची आठवण येते
आता कुठल्याच गोष्टींवर मला हसु येत नाही
कुणी हसताना दिसलं तेव्हा, तिची आठवण येते
ईथे सर्व जण मला माझ्या नावाने हाक मारतात
कुणी ऐकतोस का म्हटले कि, तिची आठवण येते
तसा स्वत:ला खुप संभाळलय मी
पण ठेच लागते जेव्हा, तिची आठवण येते
आता तर अंधारच माझी सावली आहे
कुणी ज्योत जरी लावली जेव्हा, तिची आठवण येते

मी ॠणी तिचा राहील

विश्वास होता मला एक दिवस प्रेम नक्की होईल
माहीत होतं मला एक दिवस वाट पाहण्याची परिक्षा नक्की येईल
तु शब्दांनी काही म्हण किंवा नको म्हणु
विचार करतोय की आज होकार नक्की येईल
देवाकडे उशीर आहे पण अंधार नाही
मन म्हणतंय कि तिच्याकडून संदेश नक्की येईल
माहीत नाही मला काय नेमके विपरीत घडले
पण वाटतं कि प्रेमळ शिक्षा ति नक्की देईल
मला विचारतेय का प्रेम करतो मी
का अशीच ति मला आयुष्यभर त्रास देईल
मनातल्या गोष्टी तिला सांगायच्या आहेत
पण ख़रंच ती त्या ऐकायला महत्व देईल
पाहतो तिला तेव्हा पाहतचं राहावं
वाटतं खरंच एक दिवस हॄदय बाहेर येईल
होईन मी तिचा कि होणार नाही
पण हॄदयात तिचे प्रेम कायम राहील
जीवनाचा काय पत्ता काय भरवसा
जर मेलो कधी तर त्यात तिचीच भुमिका राहील
तिच्या स्पर्शाने मनात उठलेले तरंग
दररोज माझ्या स्मरणात राहील
जर नाही देऊ शकलो माझ्या प्रेमाचा भरवसा
ही खंत माझ्या उरी वारंवार राहील
एकही क्षण दिवसाचा असा गेला नाही
ज्यावेळी तिची आठवण ना येईल
काही ना देता जे दिले आहे तिने
या जीवनातील प्रत्येक क्षणी मी ॠणी तिचा राहील

माझे लग्नानंतरचे काही दिवस

माझे लग्नानंतरचे काही दिवस

लग्नानंतरचे ते पहिलेच वर्ष होते
आनंदाला माझ्या पारावार नव्हता
आनंदाच्या क्षणांची नुसती अंघोळ होती
की सांभाळता सांभाळणे कठीण होत होते
सकाळी सकाळी मॅडमचे चहा घेऊन येणं
थोडसं लाजुनच मला झोपेतुन उठवणं
प्रेमाने तो हात माझ्या केसातुन फ़िरवणं
हळुच हसुन मला म्हणणं की
राज्ज्या चहा तर पिऊन घे नाहीतर उशीर होऊन जाईल
लवकर तयार हो, तुला ऑफ़ीसला पण जायचंय
मॅडम देवाचं रूप घेऊन आली होती
हृदय आणी मेंदुवर तिची पुर्ण पकड होती
श्वास जरी घेतला तरी तिचं नाव होत होतं
एक क्षणही दुर जाणं जीवावर येत होतं
.....................
जेमतेम पाच वर्ष लग्नाला झाली होती
त्यानंतर ची कहाणी पुर्णपणे निराळी होती
सकाळी सकाळी मॅडमचे चहा घेऊन येणं
टेबलावर आदळुन जोराने ओरडणं
आज ऑफ़ीसला जाल तर पिल्लुला शाळेत सोडुन जा
"अहो ऐकलंत का" परत एकदा आवाज आला
आज काय खास आहे गादीवरून अजुन नाही उठला
जर पिल्लुला उशीर झाला तर खबरदार
मग त्याच्या मॅडमला तुम्हीच सांभाळुन घ्यालं
न जाणो मॅडम कुठले रूप घेऊन आली होती
हृदय आणी मेंदुवर काळी सावली पडली होती
श्वास जरी घेतला तरी तिचीच विचार येत होता
प्रत्येक क्षणी मनात एकच विचार येत होता
कधी ते सुंदर दिवस परत येतील
मला परत एकदा उपवर करून देतील

मी व माझी ती

ती.......................एक वचन होतं एका वचनाच्या मागे
तू भेटशील मला प्रत्येक गल्ली अन् दरवाजाच्या मागे
तुझ्यावर प्रेम खुप होतं
पण तुच नव्ह्ता माझ्या अंत्ययात्रेच्या मागे
.........
मी.......................एक वचन होतं एका वचनाच्या मागे
मी भेटील तुला
प्रत्येक गल्ली अन् दरवाजाच्या मागे
तुच मागे वळुन पाहिलं नाहीस
अजुन एक अंत्ययात्रा होती तुझ्या अंत्ययात्रेच्या मागे

Tuesday, November 24, 2009

फ़ोटो

तुझा फ़ोटो
मी मुद्दामच
एका जुन्या फ़्रेममध्ये
लावुन ठेवला आहे
पण
गंमत बघ ना
जो येतो तो म्हणतो
फ़्रेम बाकी छानच आहे

तुझे डोळे

तुझे डोळे
हरिणीसारख़े आहेत
असं
मी अजुनही मानतो
इतक्या दिवसाच्या
विरहानंतर
ते माझ्यावर
वाघासारख़े तुटुन पडले
म्हणुन काय झाले ?

माझी पध्दत

तुला रुसायला आवडतं
हे ठीक
पण
रुसण्यापूर्वी
तुझी समजुत कशी काढायची
हे तू मला
सान्गुन ठेवीत जा
कारण
माझी पध्दत
काहीशी विचित्र आहे
असं लोक म्हणतात

अबोली

केसात अबोली
माळली म्हणून
अबोल व्हायलाच हवं
असं कुठाय
उलट अशावेळीच
गुलाबासारखं
ह्सायला
अन चाफ्यासारखं
दर्वळायला
काय हरकत आहे?